अमळनेरात हॉटेल मालकच निघाला वेटरच्या खुनातील आरोपी ; तीन महिन्यांनी खून उघडकीस


Amalnerat hotel owner turned out to be the accused in the murder of the waiter; After three months, the murder was revealed अमळनेर : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात हॉटेल मालकच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यास अमळनेर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. सीसीटीव्हीतून खुनाचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील (45, साईपूजन रेसीडेन्सी, शांतीनगर, कडोदरा, सुरत, ह.मु.अमळनेर) या वेटरचा खून झाला असून हॉटेल मालक नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (35, माळीवाडा) यास अटक करण्यात आली.

असे आहे खून प्रकरण
नरेंद्र चौधरी याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ साई व रुपाली हॉटेल आहे. दगडू पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणार्‍या कुटुंबापासून वेगळा राहून अमळनेर येथे हॉटेलवर काम करीत होता. 22 एप्रिल रोजी सहा वाजता हॉटेलमध्ये
दगडू पाटील खाली दगडावर पडल्याचे दिसून आला होता व त्यास मारहाण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने त्यास उपचारार्थ हलवण्यात आले मात्र 6 मे रोजी त्याचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी हॉटेल मालक नरेंद्र चौधरी यांच्या खबरीनुसार सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सीसीटीव्हीवरून गुन्ह्याचा उलगडा
सुरत येथील अहवाल, दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनस्थळावरील फुटेज तपासले असता 22 रोजी पहाटे मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत होता तसेच जवळ पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार करण्यात आले व डोक्यात दगडही मारला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस घनश्याम अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी (35, माळीवाडा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !