वनविभागाचा अधिकारी असल्याचे सांगत जामद्यात वाटल्या विद्यार्थ्यांनाा वह्या : तोतया अधिकारी असल्याचे कळताच आवळल्या पोलिसांनी मुसक्या
Forest department official in Bahal village in police net चाळीसगाव : वन विभागात सीसीएफ (चिफ कॉन्जरवेटीव्ह फॉरेस्ट) बतावणी करीत एका शाळेमध्ये मुलांना वह्या वाटपासाठी आलेल्या तोतया वन अधिकार्याला चाळीसगाव येथील वन अधिकार्यांच्या समयसुचकतेमुळे गजाआड व्हावे लागले. या तोतया अधिकार्याच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन रवींद्र पगारे (बहाळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताने आपण वनविभागामध्ये सीसीएफ पदावर नाशिक येथे कार्यरत असून शाळेतील मुलांना वह्या वाटपासाठी आल्याची थाप मारल्यानंतर गोपनीय माहितीवरून त्यास अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
चाळीसगावच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे या गुरूवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास कार्यालयात कामकाज करीत असतांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, जामदा, ता.चाळीसगाव येथील माध्यमिक विद्यालयात सीसीएफ (चिफ कॉन्जरवेटीव्ह फॉरेस्ट) अधिकारी शाळेतील मुलांना वह्याा वाटप कार्यक्रमास आले आहेत. नगराळे यांना शंका आल्याने त्यांनी ही बाब मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या कानावर घातली व या ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठविण्याची विनंती केली. वन विभागाच्या कार्यालयातील सी.व्ही. पाटील (वनपाल जुवार्डी), जी.एस. पिंजारी (वनपाल घोडेगाव), राहुल पाटील (वनरक्षक शिवरे), एम.पी. शिंदे (वनरक्षक पश्चिम जुवाडी) आदींनी जामदा गाठले तर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व त्यांच्या सहकार्यांनी धाव घेतली.
मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल
माध्यमिक विद्यालय, जामदा शाळेच्या गेटमधून एक इसम बाहेर आल्यानंतर पथकाला संशय आल्यानंतर त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने फॉरेस्ट अधिकारी असल्याची बतावली केली. घडल्या प्रकाराची माहिती नगराळे यांनी वरीष्ठ कार्यालयात फोन करुन सीसीएफ पदावर नितीन रविंद्र पगारे अशा नावाची व्यक्ती आहे काय बाबत चौकशी केली असता अशा कोणत्याही नावाची व्यक्ती आपल्या विभागात कार्यरत नसल्याची माहिती दिली. त्यामुळे संशयित रवींद्र पगारे यास पुढील चौकशी कामी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणल्यानंतर चौकशी करण्यात आली. पगारे याच्या मोबाईलमध्ये देखील वनविभागाचा अधिकारी असल्याबाबत ओळखपत्राचा फोटो व शासकीय गणवेषातील फोटो आढळून आला. यापक्ररणी वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


