चाळीसगावातील वयोवृद्धाची 80 हजारांची रोकड लांबवली
A cash payment of 80,000 was delayed for an elderly person in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील वयोवृद्धाची दुचाकीच्या डिक्कीतून 80 हजारांची रोकड भामट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवार, 21 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीच्या डिक्कीतून लांबवली रक्कम
गंभीरराव दौलतराव पाटील (73, विवेकानंद नगर, करगाव रोड, चाळीसगाव) हे सेवानिवृत्त शिक्षक असून शुक्रवारी दुपारी 12.30 त्यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.क्यू.1391) च्या डिक्कीत 80 हजारांची रोकड ठेवली होती मात्र अज्ञाताने संधी साधून रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात येताच पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठत आपबिती नोंदवली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.


