रावेर तालुक्यात सुकी नदीच्या पुरात तरुण वाहिला


रावेर : रावेर तालुक्याला सुद्धा पावसाचा जोरदार फटका बसला असून रावेर तालुक्यातील नद्यांना पूर येऊन नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सुकी नदीच्या पात्रातून एक तरूण बेपत्ता झाला आहे. एसडीआरएफची टिम तरुणाचा शोध घेत असल्याचे वृत्त आहे. तहसीसलदार बंडू कापसे घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध सुरू करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यात शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. यातच सुकी नदीत रझोदा येथील एक जण वाहून गेल्याची महिीती समोर आली. रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण गारबर्डी धरण परीसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी पोहायला गेला होता. पोहत असतांना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला.

घटनेची माहीती तहसीलदार बंडू कापसे यांना मिळताच एसडीआरएफच्या टीमसह घटनास्थळी पोहचले आहे. बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध सुरू आहे. सुकी नदीला दोन्ही काठ भरून पाणी वाहत असून यात बेपत्ता युवकाचा एसडीआरएफची टीम शोध मोहीम राबवित आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !