पी.एम.किसान योजनेच्या निधीत दिरंगाई : शेतकर्यांनी मांडले गार्हाणे
रावेर : पंतप्रधान किसान योजनेचा निधी मिळत नसल्याने काही शेतकर्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयत गाठत तहसीलदाचर उषाराणी देवगुणे यांच्यासमोर येणार्या अडचणी संदर्भात कैफियत मांडत तांत्रीक बाबी सोडविण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदारांनीदेखील आलेल्या शेतकर्यांची समजूत काढून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
समस्या सुटत नसल्याची तक्रार
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तहसील प्रशासनातर्फे राबवली जात असून शेतकर्यांना निधी देण्यासाठी गाव पातळीवर तलाठीदेखील परीश्रम घेत आहे परंतु काही शेतकरी या योजना संदर्भात तहसीलदार यांच्या दालनात पोहचले. आम्हाला योजनेचा निधी मिळालेला नाही, अनेक चकरा मारल्या परंतु समस्या सुटत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकर्यांनी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, आयएएफसीचा कोड देऊन सुध्दा समस्या सूटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, कैलास धनगर, भास्कर पाटील, महेंद्र महाजन, संतोष महाजन, समाधान हिवरे, राजेंद्र पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.



