निमखेडीत दोन लाखांचे बनावट फवारणीचे औषध जप्त
जळगाव गुन्हे शाखेसह कृषी विभागाची कारवाई : संशयिताला अटक
Fake spraying medicine worth two lakhs seized in Nimkhedi जळगाव : विना परवाना केळीसह कपाशीवर फवारणीचे औषध तयार करणार्या निमखेडी शिवारातील धनश्री नगरातील संजय संतोष बेलदार (मूळ रा.चुचांडेता.चोपडा, ह.मु.धनश्री नगर, निमखेडी) यास संशयिताला संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले असून संशयिताच्या घरातून दोन लाख चार हजारांचे बनावट औषध जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित संजय संतोष बेलदार (रा. धनश्री नगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे बनावट औषधांसह खते विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील चुंचाडे येथील संजय बेलदार हा विना परवाना पिकांवरील औषधी तयार करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक कारवाईसाठी रवाना झाले. या पथकाने निमखेडी शिवारातील नगरातील संजय बेलदार यांच्या घरात छापा टाकला असता, त्याठिकाणाहून बी. टी. स्पेशल पीक संजीवक, कृषी ह्युमस संजीवक कंपनीचे सुमारे दोन लाख 4 हजारांचा 390 लिटर औषधी जप्त करण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, कृषी ह्युमस हे पीक संजीवक औषध बनवून विक्री करण्याच्या त्याच्याकडे परवाना होता. परंतु ते औषध स्वतंत्र कंपनीत बनविणे बंधनकारक होते परंतु ते औषध तो स्वतःच्या घरात तयार करत असल्याचे आढळून आला.
तपासणीसाठी घेतले औषधींचे नमुने !
बी. टी. स्पेशल या पीक संजीवकाचा त्याच्याकडे कोणताही परवाना नसतांना संजय बेलदार याने बी.टी. स्पेशल हे पीक संजीवक औषध तयार करुन ते विक्री करीत होता. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी ते औषधाचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहे. पोलिसांसह कृषी विभागाची संयुक्त कारवाई ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीवत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, कृषी अधिकारी विकास बोरसे, जिल्हा गुण नियंत्रक यांच्यासह त्यांचे सहकारी विजय पवार यांच्यासह हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोना विजय पाटील, सचिन महाजन, दर्शन ढाकणे यांच्या पकाने केली.


