जळगावात परीचारीकेची हॉस्पीटलमध्ये गळफास घेत आत्महत्या


A nurse committed suicide by hanging herself in a hospital in Jalgaon जळगाव : रुग्णालयात काम करणार्‍या 21 वर्षीय पारिचारिकेने ऑन ड्यूटी असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अकिना शाजी (21 वर्ष, रा.इकाड, राज्य केरळ, ह.मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहरातील अथर्व हॉस्पिटल येथे गेल्या काही महिन्यांपासून अकिना शाजी ही तिची मोठी बहिण अगीलू शाजी हिच्यासोबत राहत होती. दोन्ही बहिणी एकत्रच हॉस्पिटलमधील रूममध्ये वास्तव्याला व त्याच ठिकाणी एकचत्र नोकरी करत होत्या. दरम्यान, शनिवारी अकिना हिची रात्र पाळी ड्यूटी होती. त्यावेळी तिची मोठी बहिण अगीलू हिची ड्यूटी संपल्याने ती रूमवर निघून गेली होती. मध्यरात्री अकिनाने हॉस्पिटलमध्येच कामावर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास काही परीचारीका नेहमीप्रमाणे रुग्णालयात कामावर आल्या असता, त्यांना रुग्णालयातील परीचारीका अकिना ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली, त्यांना मोठा धक्का बसला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख ह्या करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !