जळगावातील कारागृहात बंदीवानासोबत अनैसर्गिक कृत्य : चौघांविरोधात गुन्हा
Unnatural act with prisoner in Jalgaon jail : Crime against four जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कारवाई करण्यात आल्यानंतर जिल्हा उपकारागृहात रवाना करण्यात आलेल्या एका बंदीवानासोबत धक्कादायक प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कारागृहातील एका बंदीवानाने संबंधितासोबत अनैसर्गिक कृत्य केले तर अन्य तिघांनी याप्रकाराची मागणी केल्याने चौघांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी पीडीत बंदीवानाला लोखंडी पट्टीने मारहाण करीत जीवे ठार करण्याची धमकीदेखील दिल्याचा आरोप आहे.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव जिल्हा उप कारागृहात शहरातील 26 वर्षीय बंदीवानाला एका बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. पीडीत बंदीवान तरुणासोबत 12 जुलै रोजी रात्री अडीच ते चार वाजेच्या दरम्यान अनैसर्गिक कृत्य करण्यात आले तर 26 वर्षीय पीडीत तरुणाने या प्रकाराची मंगळवार, 25 जुलै रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण आदींविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास चर्हाटे करीत आहेत.


