दहा वर्षानंतर साकळी केंद्राला मिळाले कायमस्वरुपी केंद्रप्रमुख
यावल : तालुक्यातील साकळी जिल्हा परीषदच्या केंद्राला गेल्या 10 वर्षांपासून कायम स्वरुपी केंद्रप्रमुख नसल्यामुळे जिल्हा परीषदेच्या शाळांचा सर्व कारभार हा वार्यावर चालत होता. आता केंद्र प्रमुखांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांचे अनेक शैक्षणिक प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. दहिगावला कार्यरत विजय रंगनाथ ठाकुर यांची साकळी केंद्राच्या अतिरीक्त केंद्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एजाज शेख यांनी दिली.


