मेहरुणमधील अट्टल दुचाकी चोरटा जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

चोरीच्या तीन दुचाकी जप्त : गोपनीय माहितीवरून डीबी पथकाची कारवाई


Attal two-wheeler thief in Mehrun caught by Jalgaon MIDC police जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मेहरुणमधील दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधल्या असून त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. संतोष शांताराम सपकाळे (जोशीवाडा, मेहरुण, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कल्हेश लहू कोल्हे (विठ्ठल मंदिराजवळ, मेहरुण, जळगाव) यांच्या मालकिची हिरोहोंडा कंपनीची दुचाकी (एम.एच.15 डी.जी.6156) ही गुरुवार, 20 जुलै रोजी घरासमोरून चोरीला गेल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना ही चोरी संशयित संतोष सपकाळे याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने संशयिताला अटक केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली देत अन्य दोन दुचाकीही काढून दिल्या. ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार अल्ताफ पठाण, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !