मोठा दिलासा : बाजारपेठ पोलीस निरीक्षकांसह तिघांची जामिनावर सुटका


Big relief : Three released on bail including market police inspector भुसावळ : बायोडिझेल प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती तीन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस नाईक तुषार पाटील व खाजगी ईसम ऋषी शुक्ला यांना तब्बल आठवडेभरानंतर दिलासा मिळाला आहे. बुधवार, 26 जुलै रोजी भुसावळ सत्र न्यायालयाने तिघा संशयितांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

सहा दिवसांनी मिळाला दिलासा
लाच प्रकरणातील तीन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयाने एका दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व जामिनावर सोमवार, 24 रोजी निर्णय होणार होता मात्र तक्रारदारातर्फे अ‍ॅड.मुकेश शिंपी यांनी काही कागदपत्रे न्यायालयाला सादर केल्यानंतर न्यायालयाने बुधवार, 26 रोजी जामिनावर निर्णय देण्याचे सांगितले. बुधवारी दुपारी लाच प्रकरणातील तीनही संशयितांना 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. संशयितांना दर मंगळवारी सकाळी 11 ते 4 दरम्यान जळगाव एसीबीकडे हजेरी लावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. संशयितातर्फे अ‍ॅड.सागर चित्रे, अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.तुषार पाटील व अ‍ॅड.बी.ए.पाटील यांनी काम पाहिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !