शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटले : सातोदच्या चालकाचा मृत्यू


यावल : तालुक्यातील सातोद शेत शिवारात शेताची नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरचे चालक तथा मालक असलेले देविदास दिनकर पाटील (55, सातोद) हे दबले गेल्याने जागीच गतप्राण झाले. गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रॅक्टरखाली आल्याने मृत्यू
यावल तालुक्यातील सातोद येथे शेत गट नंबर 486 मध्ये देविदास पाटील हे विकास फेगडे यांच्या शेतात नदीच्या काठालगत विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना उताराचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पलटी झो व त्याखाली ते दबले जावून मयत झाले. ही घना सातोद, कोळवद गावात कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. यावल पोलिसात विकास झुंबा फेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यालचे निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार मेहबूब तडवी व सुनील जमदाडे यांनी 10 मिनिटात घटनास्थळ गाठत गावकर्‍यांच्या सहकार्याने ट्रॅक्टर बाजूला करून मृतदेह बाहेर काढला. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी देविदास पाटील यांनी शवविच्छेदन केले. तपास यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !