सव्वा लाखांच्या वायरची चोरी : जळगावातील कामगाराला बेड्या


Theft of wire worth a quarter of a lakh : Jalgaon worker shackled जळगाव : एमआयडीसी हद्दीतील चेतन प्रेसीजन टूल्स कंपनीच्या गोदामातून अज्ञाताने सव्वा लाखांचे लोखंडी वायरचे तीन बंडल गोेदामाच्या भिंतीची खिडकी तोडून लांबवले होते. याप्रकरणी कंपनीचे एच.आर.मॅनेजर योगेश भगवान सोनार (34, प्लॉट नं.32, कमल पार्क, सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. कंपनीतील तत्कालीन कामगारानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुभाष पंडित पाटील (39 विठ्ठल मंदीराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताला न्यायलयात हजर केल्यानंतर त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, निलोफर सैय्यद, पोलीस चालक इम्तीयाज खान आदींच्या पथकाने केली. दरम्यान, चोरी झालेले गोदाम हे किरण मशीन टूल्स कंपनीचे आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !