पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार
Unnatural abuse of a minor child in Pachora taluka पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलावर गावातीलच एकाने अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. गोल्या उर्फ ज्ञानेश्वर दिनकर महाजन (पाचोरा तालुका) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल
मंगळवार, 25 जुलै रोजी रात्री आठ वाजता पीडित मुलाचे आई-वडील शेतीची कामे आपण घरी आले असता मुलगा घरी नसल्याने शोध घेतला असता कळाले की, गावातीलच गोलू (उर्फ) ज्ञानेश्वर दिनकर महाजन यांच्यासोबत असल्याचे कळाले. आई-वडील हे गोलू महाजन यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना दरवाजा बंद आढळल्याने त्यांनी खिडकीतून पाहिल्यानंतर अनपेक्षित कृत्य नजरेस पडले. पीडीत अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसात संशयित आरोपी गोलू उर्फ ज्ञानेश्वर दिनकर महाजन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली. तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गनगे करीत आहेत.


