अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न : पारोळा तालुक्यातील आरोपीला पाच वर्ष शिक्षा


Attempt to molest a minor girl : Accused in Parola taluka sentenced to five years अमळनेर : पाच वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा न्यायाधीश एस.बी.गायधनी यांनी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. ही घटना 2 ऑगस्ट 2018 रोजी घडली होती. संतोष मुरलीधर पाटील (50, देवगाव, त.पारोळा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

पारोळा पोलिसात दाखल होता गुन्हा
तक्रारदार हे कामानिमित्त सुरतला गेल्यानंतर त्यांची पत्नी शेतात गेल्याने पीडिता व तिची मैत्रिण या दोघी घरीच अभ्यास करत होत्या. यावेळी संतोष पाटील यांनी पीडितेस जवळ बोलावून व तिला 10 रुपये कुरकुरे आणण्यासाठी दिले व पाच रुपयांचे कुरकुरे आणल्यानंतर उर्वरीत पाच रुपये परत करताना आरोपीने पीडितेला घरात बोलावून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने आरोपीच्या हाताला चावा घेत तेथून पळ काढला. या प्रकारानंतर बालिका धास्तावली होती. त्यानंतर ही बाब तिने आजीस सांगितल्यानंतर आरोपीविरोधात पारोळा पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आली होती.

पाच वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा
या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश एस.बी.गायधनी यांच्या न्यायालयात चालले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.किशोर आर.बागुल (मंगरुळकर) यांनी एकुण आठ साक्षीदार तपासले. पैकी पीडिताची साक्ष तसेच सरकारी पंच व पीडितेची आजी तसेच साक्षीदार दुकानदार व शेजारील साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली. तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांची साक्ष ग्राह्य धरीत गुन्हा सिद्ध झाला.

न्यायालयाने कलम 354 (अ) प्रमाणे पाच वर्षे शिक्षा व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच 354 (अ) (ळ) प्रमाणे तीन वर्ष शिक्षा व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा तसेच पोस्को अंतर्गत कायद्याचे कलम आठप्रमाणे पाच वर्षे शिक्षा व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा आणि अनुसूचित जाती-जमाती अधिनियमचे कलम 3 (डब्ल्यू) (ळ) प्रमाणे पाच वर्षे शिक्षा व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली. संपूर्ण शिक्षा एकत्रीतरित्या भोगावायाची आहे. चोपडा ग्रामीण रुग्णालयाचे पैरवी अधिकारी उदयसिंग सांळुके व कॉन्स्टेबल हिरालाल पाटील, कॉन्स्टेबल नितीन कापडणे, कॉन्स्टेबल राहुल रणधीर यांनी तपासासाठी सहकार्य केले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !