कनाशीच्या चालकाला मारहाण करीत मोबाईलसह रोकड लुटली


The driver of Kanashi was beaten and robbed of cash along with a mobile phone भडगाव : रस्त्याने पायी चालणार्‍या कनाशी येथील तरुणाचा रस्ता अडवत त्रिकूटाने मारहाण करीत रोकडसह मोबाईल लांबवल्याची घटना कजगाव-कनाशी रस्त्यावर सोमवारी रात्री 10.30 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात तिघांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लूट प्रकरण
सागर राजेंद्र भदाणे (26, कनाशी, ता.भडगाव) हा तरुण व्यवसायाने चालक असून बुधवारी रात्री 10.30 वाजता कजगाव-कनाशी रस्त्यावरून पायी चालत असताना लोणपिराचे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तरुणाचा रस्ता अडवत त्याला शिविगाळ करीत मारहाण केली त्याच्याकडील 13 हजार 100 रुपये किंमतीचा मोबाईल व एक हजार दोनशे रुपयांची रोकड हिसकावून तरुणाला रस्त्यावर ढकलून पळ काढला. तपास सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !