सोलापूर विभागात नॉन इंटर लॉकींग कामामुळे चार एक्स्प्रेस रद्द


भुसावळ – मध्य रेल्वे सोलापूर विभागात सोलापूर-दौंड दरम्यान नॉन इंटर लॉकिंग अिाणि प्री इंटर लॉकिंगच्या कामुळे चार एक्स्प्रेस गाड्या प्रारंभिक स्थानकापासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये अप 11403 नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस (व्हाया अकोला-हिंगोली) ही 18 व 22 रोजी रद्द करण्यात आली आहे शिवाय डाऊन 11404 कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस (व्हाया अकोला-हिंगोली) ही 19 व 23 रोजी तसेच अप 11406 अमरावती-पुणे एक्स्प्रेस 18 व 23 रोजी व डाऊन 11405 पुणे-अमरावती एक्सप्रेस 19 व 24 रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीबाबत दखल घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.