लग्न न केल्यास अॅसीड टाकण्याची धमकी : पाचोर्यातील तरुणाला अटक
Threat of throwing acid if not married: Pachora youth arrested पाचोरा : अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिला सोबत येण्यासाठी आग्रह धरत माझ्यासोबत लग्न न केल्यास अॅसीड टाकून देईल, अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित समीर सलीम पिंजारी (कुर्बाननगर, माहेजी नाका, पाचोरा) या तरुणाविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
छळ असह्य झाल्याने तरुणाविरोधात गुन्हा
शहरातील एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन पीडीता राहते. संशयिताने गेल्या दोन महिन्यांपासून (वेळ नक्की नाही) ते 27 जुलै 2023 दरम्यान दुपारी 12.30 वाजेपर्यंत पीडीतेचा शाळेचा रस्त्यावर तसेच घराकडील रस्त्यावर पाठलाग केला तसेच माझ्या सोबत चल व लग्न कर म्हणून आग्रह धरला व लग्न न केल्यास तुझ्या अंगावर अॅसीड टाकून देईल, अशी धमकीही दिली. पीडीतेने कुटूंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर पीडीतेच्या आईने पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित समीर पिंजारी विरोधात विनयभंग, अॅट्रासिटी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे करीत आहेत.


