आधी घेतली नोटरी फारकत ; आता सोबत राहण्यासाठी मारहाण करीत जळगावात महिलेचा विनयभंग


Woman molested in Jalgaon by beating her to stay with her जळगाव : सोबत का राहत नाही, एकटी का राहते? असे म्हणत 31 वर्षीय महिलेला शिविगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी संशयित निलेश अनंद जोशी (देवेंद्र नगर, गाडगेबाबा चौक, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता महाबळ चौकात घडली.

नोटरी फारकतीनंतरही सोबत राहण्याचा आग्रह
31 वर्षीय पीडीता व संशयित निलेश जोशी हे यापूर्वी सोबत राहत होते मात्र त्यांच्यात विसंवाद निर्माण झाल्याने त्यांनी नोटरी करून फारकत घेतली मात्र त्यानंतर संशयित जोशी याने पीडीतेचा रस्ता अडवत तिला सोबत राहण्यासाठी आग्रह धरला व नंतर पीडीतेच्या घरी जावून तिला शिविगाळ करीत एकटी का राहते, सोबत रहा म्हणून आग्रहही धरला व फिर्यादीला ओढाताण करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करीत विनयभंग केल्याने पीडीतेने रामानंद नगर पोलिसात तक्रार नोंदवल्यावरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !