अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार ; धरणगाव तालुक्यातील आरोपी जाळ्यात


A minor girl was abducted and tortured ; Accused in Dharangaon taluka धरणगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर ठिकठिकाणी अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपीसह पिडीत मुलीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले. अटकेतील संशयिताला गुरूवार, 27 जुलै रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. समाधान दंगल पाटील (25) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
धरणगाव तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा समाधान पाटील याने 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता पीडीत मुलीला फूस लावून दुचाकीने पळवून नेले. त्यानंतर चोपडा येथून लक्झरीने सुरत येथे गेले. तिथे नातेवाईकांकडे 10 ते 12 दिवस राहिल्यानंतर समाधान पाटील याने मुलीला लक्झरीने शिर्डी येथे घेवून गेला. त्या ठिकाणी एका झोपडीत राहून तिच्यावर अत्याचार केला. 25 जुलै रेाजी दोघे शिर्डी बसस्थानकात असतांना शिर्डी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवार, 27 जुलै रोजी दुपारी दोन वाजता संशयित आरोपी समाधान पाटील याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !