चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई : सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील गुजदरी गावातील अवैध सहा गावठी हातभट्टीवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई करीत 90 हजारांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ उडाली.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
चाळीसगाव तालुक्यातील अति दुर्गम भागात वसलेल्या गुजदरी गावात चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी सहा ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी दारू बनविण्यासाठी कच्चे आणि पक्के रसायन असा एकूण 90 हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. दारू तयार करणार्यांचा शोध घेणे सुरू आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे, हवालदार युवराज नाईक, ओंकार सुतार, नितीन सोनवणे, गोवर्धन बोरसे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर आदींच्या पथकाने केली.


