अमळनेरात महिला भाविकाची चैन लांबवली


A woman devotee’s life was extended in Amalner अमळनेर : मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून 18 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन लंपास भामट्याने गर्दीचा फायदा घेत लांबवली. ही घटना मंगळवार, 25 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण खोडके व जयश्री खोडके हे दाम्पत्य 25 रोजी मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आले असता मंदिरातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 10 ग्राम वजनाची सोन्याची चैन लांबवली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !