जळगाव एलसीबीची धडाकेबाज कामगिरी : तीन गुन्ह्यांचा उलगडा, पाच अटकेत
Brilliant performance of Jalgaon LCB : Three crimes solved, five arrested जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने तीन गुन्ह्यांचा उलगडा करीत पाच आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मोबाईल हिसकावून जबरी चोरीच्या घटना वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत.
मोबाईल चोरी प्रकरणी आरोपी जाळ्यात
पहिल्या पथकातील कर्मचार्यांनी रवंजा, ता.एरंडोल येथील आरोपी विठ्ठल साहेबराव देशमुख यास ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिसात दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या पथकाने सहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल हस्तगत केला. अटकेतील विठ्ठल साहेबराव देशमुख यास पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
दुसर्या पथकातील कर्मचार्यांनी मालेगाव येथील आरोपी इमरान उर्फ डोकोमो नाजीम अन्सारी आणि आरीफ इकबाल शहा अशा दोघांना ताब्यात घेत मेहुणबारे पोलिसात दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अटकेतील दोघांकडून दहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. अटकेतील दोघांना मेहुणबारे पोलिसांच्या देण्यात आले.
तिसर्या पथकातील कर्मचार्यांनी एजाज खान मजीद खान (रा.शेंदुर्णी, ता. जामनेर) आणि फारुख रशीद शेख (रा.नागदुली, ता.एरंडोल) अशा दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अठरा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. पिंपळगाव हरेश्वर पोलिसात दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला गेला. अशाप्रकारे तिघा पथकांनी मिळून 34 हजार रुपये किंमतीचे एकूण चार मोबाईल हस्तगत केले आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदिप सावळे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, विजय पाटील, किरण चौधरी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटोल, लोकेश माळी, अशोक पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.


