अट्टल दुचाकी चोरटे चोपडा पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या चार दुचाकी जप्त
Attal two-wheeler thieves in Chopda police net : four stolen two-wheelers seized चोपडा : चोपडा पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात तपासादरम्यान दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे तर अन्य एका विधीसंघर्ष बालकालादेखील ताब्यात घेतले आहे. चोरट्यांकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. पवन संजय साळुंखे (रा.सुंदरगढ़ी चोपडा) आणि अमोल राजेंद्र अहिरे (रा.खडगांव, ता.चोपडा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोपनीय माहितवीरून कारवाई
चोपडा शहरातील लोहाना पेट्रोल पंप परीरसरातून 12 जानेवारी रोजी संजय नाना देवरे यांची दुचाकी चोरीला गेल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासात हवालदार शेषराव तोरे यांन संशयितांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्यानंतर दोघांनी एक लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या तर अन्य एका अल्पवयीनाचा सहभाग असल्याने त्यासदेखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.अधीक्षक ऋषीकेश रावले, पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य निरीक्षक अजीत सावळे, सहा.निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनशाम तांबे, सहायक फौजदार सुनील पाटील, हवालदार शेषराव तोरे, हवालदार विलेश सोनवणे, हवालदार दीपक विसावे, हवालदार जितेंद्र सोनवणे, हवालदार शिवाजी धुमाळ, हवालदार ज्ञानेश्वर जवागे, हवालदार प्रदीप राजपूत, नाईक संतोष पारधी, नाईक हेमंत कोळी, नाईक प्रमोद पाटील, नाईक मधुकर पवार, नाईक संदीप भोई, नाईक किरण गाडीलोहार, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे, कॉन्स्टेबल प्रकाश मधुरे, कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद पवार, कॉन्स्टेबल विजय बच्छाव, सुमेर बधरे, शुभम पाटील, आत्माराम अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.



