दळवेलला धाडसी घरफोडी : सहा लाखांचा ऐवज लांबवला


Daring burglary to Dalvel : compensation of six lakhs extended पारोळा : शहराकडून चोरट्यांनी आता खेड्याकडे मोर्चा वळत धाडसी घरफोडी करीत तब्बल सहा लाखांचा ऐवज लांबवल्याने पारोळा तालुक्यातील दळवेल येथे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला केला टार्गेट
दळवेल येथील दीपक पांडुरंग पाटील शेतकरी कुटुंब 29 रोजी नेहमीप्रमाणे घरातली कामे आवरून शेतात निघून गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील 14 तोळे सोने त्यात (मंगल पोत, चार सोन्याच्या अंगठ्या) आणि सव्वा दोन लाख रुपये एकूण रोख, असा एकूण सहा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला.







दरम्यान, दीपक पाटील यांनी काही महिन्यापूर्वी कापूस विक्रीतून आलेले पैसे हे घरातच ठेवले होते. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे दाखल झाले होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !