भडगाव तालुक्यातील शिवणीतील पिता-पूत्रांचा संशयास्पद मृत्यू


Suspicious death of father and son in Shivani in Bhadgaon taluka भडगाव : पिता-पूत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर जवळच असलेल्या शेडमध्ये 12 वर्षाचा मुलाचा मृतदेह आढळला. संजय साहेबराव चव्हाण (48) आणि कौशिक संजय चव्हाण (12) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
शनिवारी सकाळी संजय हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तर जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मुलगा कौशिक हा बंगळीवर मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार कळताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी पिता- पुत्रांना मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पिता-पुत्राच्या मृत्यूचे नेमकं कारण समजू शकले नाही.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !