खडके आश्रम शाळेत मुलावरही अनैसर्गिक अत्याचार : संस्थाध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा
Indecent abuse of a child in Khadke Ashram School : A case against four including the president of the institution एरंडोल : एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत काळजी वाहकाने एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावरही अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणात केअरटेकर, संस्था अध्यक्ष व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच अल्पवयीन मुलींसह बालकाचेही शोषण !
खडके बुद्रुक येथील मुला-मुलींच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात काळजीवाहक गणेश पंडित हा पोलीस कोठडीत आहे. शनिवारी बालगृहातील 11 वर्षीय बालकानेही पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.






होळीच्या दिवशी अल्पवयीन बालकाने पाणी भरले नाही म्हणून वसतिगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित याच्या सांगण्यावरून आठ विधी संघर्षित बालकांनी पीडित बालकास लाथा-बुक्क्यांनी पाठ, छाती व पोटावर मारहाण केली तसेच एका रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पीडीत बालक वॉशरुमला गेला असताना गणेशने त्याच्यावर शारीरीक व लैंगिक अत्याचार केला. ही घटना संस्थेच्या अध्यक्ष व शिक्षकांना सांगितली पण त्यांनीही दुर्लक्ष केले. जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीनंतर अल्पवयीन बालकावरदेखील अत्याचार केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन बालकांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.
मारहाण करणार्या आठ मुलांविरुद्ध गुन्हा !
पीडित बालकाच्या तक्रारीवरून काळजीवाहक गणेश पंडित, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील, भूषण प्रभाकर पाटील यांच्यासह बालगृहातील आठ अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन व भूषण पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. काळजीवाहक शिवाजी पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.


