जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारातून बाळाला दिला जन्म : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


A minor girl in Jalgaon taluka was tortured and gave birth to a baby : the accused is in the net of MIDC police जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून अत्याचारातून पीडीत मुलीने मुलाला जन्म दिला तर याप्रकरणी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दलू बारेला (24, तोंडापूर, ता.जामनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दोन वर्षांपूर्वी तरुणीला पळवले
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका भागातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्याला होता. संशयित आरोपी सुनील बारेला याने 25 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 11 वाजता अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरूवातील बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, अल्पवयीन मुलीला पळवून नेत जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावातील एका देवीच्या मंदीरात लग्न करण्यात आले व यानंतर गावातील एका शेतात राहून पीडीत मुलीवर अत्याचार करण्यात आला. अत्याचारातून पीडीत मुलीने मुलगा गौरव (11 महिने) याला जन्म दिला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी सुनील बारेला याला अटक केली.







यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोक्सोचे कलम वाढविण्यात आले. संशयित आरोपी याला शनिवारी 29 जुलै रोजी दुपारी 2 वाजता जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या.सुरज केंद्रे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला. तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !