जळगावात त्रिकूटाने महिलेचे हातचलाखीने 67 हजारांचे दागिने लांबवले
जळगाव : महिलेला बोलण्यात गुंतवून त्रिकूटाने हातचलाखी करीत 67 हजार रुपये किंमतीचे दागिणे लांबवले. ही घटना शिरसोली नाक्याजवळील दत्त मंदिराजवळ घडली. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बोलण्यात गुंतवून लांबवले दागिणे
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत सुशीला आनंदा कापडे (53) ही महिला वास्तव्यास आहे. सुशीला या शुक्रवारी दुपारी अडीच वाजता तांबापुरा मच्छिमार्केट कडून शिरसोली नाक्याकडे जात असतांना रस्त्यात त्यांना एक अनोखळी महिला व पुरूष भेटले. या दोघांनी हातचलाखी करत सुशीला यांच्या अंगावरील सोन्याचा गोप, सोन्याचे कानातले टोंगल, सोन्याचे डोरले असे एकूण 67 हजारांचे दागिणे लांबविले. दागिणे चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर सुशीला कापडे यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अनोळखी महिला व पुरूषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉस्टेबल सचिन मुंडे करीत आहेत.








