चोरीच्या पाच दुचाकींसह मुक्ताईनगरातील चोरटा एलसीबीच्या जाळ्यात


Thief in Muktainagar with five stolen bikes in LCB’s net  जळगाव : चोरीच्या पाच दुचाकींसह मुक्ताईनगरातील दुचाकी चोरट्याला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून बोदवडसह मुक्ताईनगर, मलकापूर व सूरत येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सागर रामदास कोळी (मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितवीरून कारवाई
आरोपी कोळी हा चोरीच्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने आरोपीला ताब्यात घेताच त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देत पाच दुचाकी काढून दिल्या. आरोपीला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व रमेश चोपडे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक मोतीलाल चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !