स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त बोदवडमध्ये रक्तदान शिबिर
बोदवड : शिवसेनाप्रमूख हिंदूह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. मनुर गण, नाडगाव गण, शेलवड गण व बोदवड शहरातील शिवसैनिकांनी रक्तदानाच्या कार्यक्रमास उपस्थिती दिली. बोदवडमधील अग्रसन भवन तर साळशिंगी गणातून सुरवाडा येथील प्रार्थमिक आरोग्य ऊपकेंद्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. तालुक्यातून 63 शिवसैनिकांनी रक्तदान केले. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या रक्तपेढीतील कर्मचारी यावेळी एपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोदवड शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शांताराम कोळी, दीपक माळी, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक कलीम शेख, विजय चौधरी, नगरसेवक सुनील बोरसे, भास्कर गुर्चळ, रंजन पाटील, योगेश राजपूत, आतिष सारवान, जितेंद्र पाटील, शांताराम कोळी, गोपाळ पाटील, रंजन पाटील, अजय पाटील, अमोल व्यवहारे, निलेश माळी, शैलेश खोडके, संभाजी साठे, संतोष देठे, आनंद खोडके उपस्थित होते. साळशिंगी गणातील रक्तदान शिबिरात गजानन पाटील, धनराज पाटील, सोमेश्वर पाटील, गजानन पाटील, किरण दाडंगे, अमोल पाटील, मोहन दोडके आदींची उपस्थिती होती.

यावलमध्ये 21 दात्यांचे रक्तदान
यावल- स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीत युवा सेना परीवारातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. 21 दात्यांनी रक्तदान केले. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, जळगाव यांचे सहकार्य लाभले.
यांची होती उपस्थिती
शिवसेना तालुका प्रमुख रवी सोनवणे, उपसंघटक पप्पू जोशी, युवा सेना तालुकाप्रमुख गोटू सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवा सेना शहर प्रमुख सागर देवांग, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, शिक्षक सेना संपर्क प्रमुख भूषण नागरे, उपशहर प्रमुख सागर बोरसे, उपशहर प्रमुख प्रवीण बडगुजर, युवा सेना सरचिटणीस विजय पंडित, उपशहर प्रमुख सचिन कोळी, विभाग प्रमुख गिरीश बडगुजर, युवा सेना प्रसिद्धी प्रमुख कुणाल बडगुजर, भूषण पाटील, सोहम महाजन, तेजस बडगुजर, मयूर खर्च आदींसह शिवसैनिक बांधव उपस्थित होते.


