सावखेडासीमला भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाच्या डोक्यात वीट मारली


Sawakhedasim hit one on the head with a brick when he went to settle the quarrel
यावल :
यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला एकाने वीट मारून फेकली तसेच त्याला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
सावखेडासीम, ता.यावल येथील शाफजान तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा असलम अहमद तडवी हा गावातील भांडण सोडवण्यासाठी गेला होता. भांडण सोडवत असल्याचा राग येऊन त्याला मोहसीन गुलशेर तडवी याने हातातील वीट त्याच्या डोक्यावर फेकून मारली. त्यात डोक्याला दुखापत झाली तसेच तू आमच्या भांडणात पडला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी त्याला धमकी देवून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मोहसीन तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळ करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !