तलवारीच्या धाकावर दहशत : कुविख्यात आरोपी चाळीसगाव शहर पोलिसाच्या जाळ्यात
Terror at the point of sword: Notorious accused in Chalisgaon city police net
चाळीसगाव : तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या दोघांच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास ही कारवाई चाळीसगाव शहरातील शास्त्रीनगर भागातील साई बाबा मंदीराजवळ करण्यात आली. मंजीतसिंग दिलीपसिंग बावरी (19, शैंदला, मेहकर बुलढाणा, ह.मु बस स्टॅण्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) व किरण सखाराम गवळी (22, लक्ष्मीनगर, संतोषीमाता मंदीरामागे, चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश दिलीप बेलदार, दीपक प्रभाकर पाटील, निलेश हिरालाल पाटील, अमोल युवराज भोसलेे, नंदकिशोर शिवराम महाजन, शरद मांगो पाटील आदींच्या पथकाने केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश दिलीप बेलदार व कॉन्स्टेबल निलेश हिरालाल पाटील करीत आहेत.








