जळगावसह अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध


Notorious Criminals from Jalgaon and Amalner Arrested जळगाव : जळगावसह अमळनेरातील गुन्हेगार स्थानबद्ध करण्यात आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रामनंद हद्दीतील विशाल भिका कोळी (24, कोळीवाडा पिंप्राळा, जळगाव) यास नागपूर कारागृहात तर अमळनेर येथील विशाल दशरथ चौधरी (27) यास येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. जळगावचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

जळगावातील गुन्हेगाराविरोधात 11 गुन्हे
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल कोळी याच्याविरोधात दरोडा टाकणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबर दुखापत, बेकायदेशीर मंडळी जमा करून अटकाव करणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, सट्टा जुगार खेळणे असे वेगवेगळे एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी दोन वेळा हद्दपार करण्यात येऊन देखील त्याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यानुसार एम.राजकुमार यांनी अहवालाचे अवलोकन करीत प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवल्यानंतर अट्टल गुन्हेगार विशाल भिका कोळी याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे.







आरोपी नागपूरात स्थानबद्ध
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, हवालदार विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलाल सिंग परदेशी, किरण पाटील यांनी संशयित आरोपीला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.

अमळनेरातील गुन्हेगार येरवड्यात स्थानबद्ध
अमळनेर शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या विशाल दशरथ चौधरी (27) या गुन्हेगाराला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. 2023 या वर्षात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच एमपीडीएच्या कारवाई अमळनेरात झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट, तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

आरोपीची येरवड्यात रवानगी
विशालविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हवालदार किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या मदतीने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. प्रस्तावाची मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी, रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला 1 ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, कैलास शिंदे, घनश्याम पवार, सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी याला पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध केले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !