जळगावात जबरी चोरीसह घरफोडी : भुसावळातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Burglary with forcible theft in Jalgaon : Accused in Bhusawal in the net of crime branch भुसावळ : जळगाव शहरात जबरी चोरी आणि घरफोडीतील चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातून अटक केली आहे. चोरीतील मोबाईल पोलीसांनी हस्तगत केला असून संशयिताला जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अरबाज आरीफ पटेल (जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जबरी लूट प्रकरणी दाखल आहे गुन्हा
जळगाव शहरात एकाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित भुसावळातील असल्याचे स्पष्ट होताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन, ईश्वर पाटील, किरण चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी अरबाज आरीफ पटेल याला भुसावळ शहरातून अटक केली. त्यांचकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करीत त्यास पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !