भुसावळातील कुविख्यात हसनअली नागपूरात ‘स्थानबद्ध’


Notorious Hasan Ali of Bhusawal ‘stationed’ in Nagpur भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींविरोधात भुसावळ पोलीस दलाने कंबर कसली असून त्यांच्याविरोधात हद्दपारीसह एमपीडीएची कारवाईचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पाच उपद्रवींवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून मंगळवारी पुन्हा शहरातील कुविख्यात हसनअली उर्फ आशू नियाजअली ईराणी (24, पापानगर, झोपडपट्टी, ईराण, मोहल्ला, भुसावळ) यास स्थानबद्ध करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश पारीत करताच गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपीला यंत्रणेने ताब्यात घेत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कारवाई
संशयित हसनअली ईराणी विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात चैन स्नॅचिंगचे तब्बल 11 गुन्हे दाखल असून त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आरोपी जामिनावर सुटताच गुन्हे करीत असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे तत्कालीन निरीक्षक राहुल गायकवाड यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार केल्यानंतर या प्रस्तावाची पाहणी गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकार्‍यांनी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे हा प्रस्ताव सादर होवून तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला.







अट्टल आरोपी नागपूरात स्थानबद्ध
पसोमवारी रात्री उशिरा जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी करताच भुसावळ बाजारपेठ प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, हवालदार आत्माराम भालेराव, सुनील जोशी, रमण सुरळकर, तेजस पारीस्कर, योगेश महाजन, प्रशांत सोनार, योगेश माळी, सचिन चौधरी आदींनी मंगळवार, 1 रोजी संशयिताला ताब्यात घेत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. या कारवाईने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, आगामी काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या अनेकांवर कठोर कारवाईचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !