शिरसोलीतील पद्मालय इंग्लिश स्कूलमध्ये चोरी : त्रिकूट एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Theft at Padmalaya English School in Shirsoli : The trio in MIDC police’s net जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी त्रिकूटाला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात पद्मालय इंग्लिश मिडियम स्कूलमधील स्टोअर रूमचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ईलेक्ट्रीक मोटार, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, इन्व्हर्टरच्या बॅटर्‍या असा मुद्देमाल चोरून नेला तसेच शाळेतील कागदपत्रांचे नुकसान केले होते. याप्रकरणी शिक्षक निशादराज रंगनाथ बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 जुलै 2023 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी केलेल्या तपासात ही चोरी शिरसोली गावातील मुलांनी केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भील (22), किरण गोपाळ कोळी (21) आणि मयूर गोपाळ बारी (18, सर्व रा.शिरसोली, ता.जि.जळगाव) यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बुधवार, 2 ऑगस्ट रोजी तिघांना जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या.सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटकेतील संशयिताकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.







यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार जितेंद्र राठोड, पोलीस नाईक समाधान टहाकळे, इम्रान सैय्यद, शुध्दोधन ढवळे, किशोर पाटील, योगेश बारी, सुधिर सावळे, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगळे, विशाल कोळी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !