जळगावात प्रिंटींग प्रेस दुकानाला भीषण आग


A fire broke out at a printing press shop in Jalgaon जळगाव : शहरातील न्यू बी.जे.मार्केटमधील तिसर्‍या मजल्यावरील विकास नारखेडे यांच्या मालकीचे अमोल इंटरप्रायझेस या दुकााला गुरुवारी दुपारी चार वाजता अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीचा विळखा वाढल्यानंतर या संकुलातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळवताच दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

शॉर्ट सर्किटने आगीचा संशय
जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट येथील तिसर्‍या मजल्यावर विकास नारखेडे यांच्या मालकीचे अमोल इंटरप्रायझेस नावाचे प्रिंटींग प्रेस दुकान आहे. या ठिकाणी लहान-मोठे पत्रक छपाई होतात. गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामुळे काही वेळात भीषण आगीत रूपांतर झाले. यावेळी मार्केटमधील व्यापार्‍यांसह ग्राहकांची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दुकानातील छापाई मशीनरीसह कागद जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !