चाळीसगावातील सेंट्रल बँकेसमोरून ग्राहकाचे दोन लाख धूम स्टाईल लांबवले
Two lakh dhoom styles of a customer were extended in front of the Central Bank in Chalisgaon चाळीसगाव : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या हातातील दोन लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी धूम स्टाईल हिसकावून पळवली. ही घटना चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील सेंट्रल बँकेसमोर घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी घडली घटना
देवळी, ता.चाळीसगाव येथील पैठणी उत्पादक माधव पदमाकर रणदिवे हे शुक्रवार, 4 रोजी दुपारी 1.33 वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील सेंट्रल बँकेत सुमारे दोन लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांचे वडील बँकेबाहेर कारमध्ये थांबले होते. सेंट्रल बँकेतून स्लीप घेऊन रकमेचा तपशील भरत असतांना क्रीम रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम माधव रणदिवे यांच्याजवळ आला व तुम्हाला बाबांनी गाडीत बोलावले आहे, असे सांगितले. वडिलांनी बोलावले असेल म्हणून माधव रणदिवे हे बँकेतून बाहेर पडून वडिल बसलेल्या कारकडे जात असतांनाच एक काळ्या रंगाची मोटार सायकलसमोर आली व त्यावरील दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने रणदिवे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पळ काढला.त्यांच्यामागोमाग बँकेत आलेला त्या इसमानेही पळ काढला. या बॅगेत दोन लाखांची रोकड होती.






गर्दीचा फायदा घेत भामटे पसार
काही क्षणात घडलेल्या या प्रकाराने रणदिवे यांनी चोर चोर म्हणून पळाले, पण भामटे गर्दीचा फायदा घेऊन कोणत्यातरी रस्त्याने निघुन गेले. रणदिवे यांनी तडक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना लुटीची माहिती दिली. याप्रकरणी रणदिवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.


