जळगावच्या संभाजी नगरात घरफोडी : 58 हजारांचा ऐवज चोरीला


Burglary in Jalgaon’s Sambhaji Nagar : 58 thousand stolen जळगाव : जळगावात चोरट्यांचा उच्छाद कायम आहे. संभाजी नगरात वृध्द महिलेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 58 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा उच्छाद कायम
सरला भगवान भामरे (67, संभाजी नगर, जळगाव) या वृध्द महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 19 जून सायंकाळी सहा वाजता ते शुक्रवार, 4 ऑगस्ट पहाटे पाच ाजेच्या सुमारास त्यांचे संभाजी नगरातील घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 58 हजारांचा मुद्देमाल लांबविला. वृध्द महिला घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !