घरगुती गॅसचे अवैधरीत्या वाहनात रीफिलिंग करणारे रडारवर : दोघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Illegal refilling of household gas in vehicles on radar : Two in Crime Branch’s net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने घरगुती गॅस वाहनात अवैधरीत्या रीफिलिंग करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील बळीराम पेठ परीसरातील बाजारपेठेसह वस्ती परीसरात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली. फारूख रौफ खाटीक (28, रा.न्यू फेडरेशन, पिंप्राळा) व शाकीब खान सलीम खान (35, काट्या फाईल शनीपेठ, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्यानंतर अवैधरीत्या गॅस रीफिलिंग करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कारवाईने शहरात उडाली खळबळ
या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर, गॅस भरणारे कॉम्प्रेसर, वजन काटा आदी एक लाख रुपये रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला. शहरातील बळीराम पेठ परीसरात अवैधरीत्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. बळीराम पेठ भागातील दुर्गादेवी मंदीरासमोरील एका टपरीवर आणि त्याच परीसरातील मराठी शाळा क्रमांक 17 जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी 12 वाजता छापा टाकत दोघांना अक केली.







संशयित आपल्या टपरीमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅसचा वापर करून रीक्षात व इतर वाहनात भरत असतांना रंगेहात आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच घटनास्थळावरून घरगुती गॅस सिलेंडर, वजन काटा, ईलेक्टीक पंप सोडलेले कॉम्प्रेसर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई !
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, हवालदार अक्रम शेख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, प्रीतम पाटील यांच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !