गोंडगाव घटनेतील पीडीतेला किनगावात श्रद्धांजली


यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे हिंदवी स्वराज्य सेना संघटना व ग्राम विकास, किनगाव यांच्या वतीने भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेतील पीडीतेला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच चिमुकल्याच्या हत्येचा निषेध करण्यात आला. गावातील ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिराच्या आवारात बालिकेला श्रध्दांजली वाहण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
किनगाव, ता.यावल येथे ग्रामदैवत आई भवानी मातेच्या मंदिर आवारात हिंदवी स्वराज्य सेना संघटना व ग्रामविकास किनगाव यांच्या वतीने भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृन हत्या करण्यात आली होती. या घटनेतील दोषी संशयीत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. पीडीत अल्पवयीन बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष व डांभुर्णीचे उप सरपंच पुरुजीत चौधरी, राहुल पाटील, मोहन पाटील, संभाजी पालवे, पंकज हिवराळे, अनिल मराठे, रोहित मराठे, दीपक पाटील, पत्रकार आर.ई.पाटील, योगेश पाटील, बाबुलाल पाटील, संजय वराडे, योगेश पाटील, विनोद पाटील, बापू कुंभार, प्रज्वल बारी, उमेश पाटील, दीपक चौहान, विशाल पाटील, गौरव कोळी, अनिल पाटील, समाधान पाटील, समाधान महाजन, योगेश पाटील, डिगंबर पाटील, राज पाटील, ऋषिकेश मोरे, सुरेश साळुंके, न्यानेश पाटील, सुदर्शन पाटील, टिनू पाटील, उदय पाटील, मुन्ना सैय्यद, गुड्डू पिंजारी, जाकीर कुरेशी, बाबा कुरेशी, आसीफ कुरेशी, समीर शेख व सुभाष पाटीलसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !