वीज मीटरमध्ये छेडछाड करीत वीज चोरी : दोनगावच्या आरोपीला एक वर्षांची शिक्षा


Electricity theft by tampering with electricity meter : Accused from Dongaon gets one year sentence जळगाव : महावितरण कंपनीच्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याप्रकरणी संशयिताला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड जळगाव जिल्हा न्यायालयाने मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुनावली.

मीटरमध्ये फेरफार करीत वीज चोरी
भडगाव तालुक्यातील दोनगाव येथील रहिवासी रऊफ अली अहमद अली यांखी टोनगाव शिवारात कंपनी असून या कंपनीतील वीज मीटरमध्ये रऊफ अली अहमद अली याने मीटरची छेडछाड करत रीमोट कंट्रोल व जामरसारख्या उपकरणे वीज मीटर बंद केल्याचे तपासणीत उघड झाले तर 24 महिन्यात एकूण महावितरण कंपनीचे 15 लाख 33 हजार 690 रुपयांचे आर्थिक नुकसान करण्यात आले. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात रउफ अली अहमद अली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पंच व फिर्यादी यांचे साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जळ







साक्ष ठरली महत्त्वाची
गाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. यामध्ये सरकारी वकील वैशाली महाजन यांनी प्रभावी बाजू मांडली. युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टासमोर आलेल्या पुरावा लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी रउफ अली अहमद अली याला दोषी ठरवत एक वर्षाची सक्त मजुरीचे शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला तसेच महावितरणची रक्कम 15 लाख 33 हजार 690 रुपये ही तीन महिन्याच्या आत वीज वितरण कंपनीला भरून देण्याचे आदेशदेखील देण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !