वरणगावी रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
वरणगाव- नागेश्वर महादेव मंदिराकडील रेल्वे खांबा क्रमांक 457/29 जवळ नागपुरकडून येणार्या अप लाईनवर शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास 45 वर्षीय इसमाचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वरणगाव स्टेशन मास्तर यांनी वरणगाव पोलिसात खबर दिल्यारून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नागेश्वर महादेव मंदिराजवळील खांबा क्रमांक 457/29 जवळ अनोळखीचा मृतदेह आढळल्यानंतर स्टेशन मास्तरांना माहिती देण्यात आली. याबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला कळवल्यानंतर मयताजवळ असलेल्या कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली. वसंतकुमार सोनुलाल मरावी (45, रा.बिनाईका ता.जि.मंडला) असे मयताचे नाव आहे. मयताचा मोठा भाऊ परीवारा सोबत भुसावळातील रेल्वे कॉट्रॅक्टर दिनेश गायकवाड यांच्याकडे कामाला असल्याचे सांगण्यात आले. वरणगाव रुग्णालयातील डॉ.क्षितीजा हेंडवे यांनी शवविच्छेदन केले. तपास सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुनील वाणी, हवालदार मनोहर पाटील, अजय निकम, गणेश शेळके पुढील करीत आहे.


