जळगावात कोयत्याच्या धाकावर दहशत : संशयित रामानंदनगर पोलिसांच्या जाळ्यात


Terror in Jalgaon due to coyotes : Suspect in Ramanandnagar police net जळगाव : कोयत्याच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या संशयिताला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली असून संशयिताकडून लोखंडी कोयता जप्त केला आहे. शहरातील समता नगर परीसरातील धामणवाडा भागात ही कारवाई करण्यात आली.

कोयत्याच्या धाकावर दहशत भोवली
जळगाव शहरातील समतानगर परीसरातील धामणवाडा परीसरात संशयित आरोपी राहुल नवल काकडे (23, समता नगर, जळगाव) हा हातात लोखंडी कोयता घेऊन धाक दाखवत मी या गल्लीचा दादा आहे, माझ्या नादी लागाल तर या कोयताने एकाला मारून टाकेल, अशी धमकी देत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत संशयित आरोपी राहुल काकडे याला मंगळवारी सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी अटक केली. संशयिताकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 9 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, पोलीस नाईक, राजेश चव्हाण, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांनी केली. तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !