जळगाव महापालिका महापौरपदी भारती सोनवणे बिनविरोध
जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपने त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी 24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेनेही भाजपला समर्थन दिले. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली होती, केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याने सोमवारी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निवडीची घोषणा केली. निवडीची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली. दरम्यान, महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने रीक्त जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. भारती सोनवणे ह्या उपमहापौर राहिलेल्या आहेत. त्या भाजप नेते स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत.
