यावल-भुसावळ रस्त्याच्या कामाला सुरूवात


यावल : यावल ते भुसावल या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली अपघात नित्याची बाब ठरत होती. वाहनधारकांच्या होणार्‍या त्रासाला केंद्रस्थानी ठेवून हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा यासाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, अशी जोरदार मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केली होती. संबंधित अधिकार्‍यांनी याची त्वरीत दखल घेऊन यावल-भुसावळ रस्त्याचे काम व डागडुजी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ं

चांगल्या दर्जाचे काम होण्याची अपेक्षा
हे काम त्वरीत सुरू केल्याने प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे वाहनधारकांकडून आभार मानले जात आहेत. वर्दळीचा मार्ग असल्याने वारंवार मोठ-मोठी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था होत असल्याने यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कामाकडे अधिक लक्ष देवून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !