विवाह करण्यास नकार ; भुसावळातील युवतीवर कटरने हल्ला : तरुणाविरोधात गुन्हा


refusal to marry; Attack on a young woman in Bhusawal with a cutter: a crime against the youth भुसावळ : भुसावळ शहरातील एका भागातील युवतीने युवकाला विवाह करण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात युवकाने खिश्यातील कटरद्वारे युवतीच्या छातीवर, हातावर मारून दुखापत केली. ही घटना कन्हाळा ते खेडीरोडवर एका शेताजवळ कन्हाळा शिवारात शुक्रवार, 8 रोजी घडलयानंतर तालुक्यात खळबळ उडाली. युवतीच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात युवकाविरूध्द गुन्हा दाखल झाला.

लग्नाला राग दिल्यानंतर युवतीवर हल्ला
भुसावळ शहरातील एका भागातील 21 वर्षीय युवती ही कन्हाळा शिवारातील शेतात गेली असता तेथे हंसराज चव्हाण उर्फ पिंटू (रा. दिनदयाल नगर, भुसावळ) हा तेथे गेला. पिंटू हा रीक्षाच्या खाली उतरून तु माझ्याशी लग्न कर असे म्हणत होता मात्र युवतीने तु नेहमीच मला मारहाण आणि शिवीगाळ करीत असल्याने मला तुझ्याशी लग्न करायचे नाही. असे सांगितल्याने पिंटूने त्याच्या खिश्यातून कटर सारखे हत्यार काढून युवतीच्या उजव्या, डाव्या हातावर तसेच छातीवर मारहाण करून दुखापत केली.







यावेळी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात हंसराज चव्हाण उर्फ पिंटू विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे हे पुढील तपास करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !