भुसावळातील तरुणाला पावणेनऊ लाखांचा गंडा
टास्क पूर्ण करण्यास सांगून हडपली रक्कम : सायबर पोलिसात गुन्हा
A young man from Bhusawal was given a sum of fifty-nine lakhs भुसावळ : टास्क पूर्ण करण्यास सांगून भुसावळातील तरुणास सायबर भामट्यांनी तब्बल पावणेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
भुसावळातील चेतन कन्हैय्या फिरके (गिरीजा कॉलनी, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान राज चंद्रिका सांगणार्या युजर आयडीवरील भामट्याने टेलिग्रामवरून संपर्क साधला व टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा (बोनस) मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला व तरुणाच्या एसबीआय खात्यातून वेळोवेळी आठ लाख 82 हजारांची रक्कम हडपली तसेच केवळ सहा हजार 825 रुपये ऑनलाईन ट्रान्सपर केले मात्र अन्य रक्कम ट्रान्सपर न करता फसवणूक केली तसेच बनावट न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज असे बनावट लेटरही पाठवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील करीत आहेत.








