यावल शहरात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत
यावल : शहरात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व अंकलेश्वर-बर्हाणपुर राज्यमार्गावरील पंचशील नगरात सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह आमदार शिरिष चौधरी यांनी जनतेशी संवाद साधत काँगे्रसच्या जनसंवाद यात्रेची माहिती दिली व सत्ताधार्यांकडून कशा प्रकारे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे याची माहिती दिली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात शनिवारी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रा दाखल झाली. शहरातून रॅली काढत या जनसंवाद यात्रेचा समारोप शहरातून मार्गस्त होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपुर राज्य मार्गालगतच्या आठवडे बाजारातील पंचशील नगरात करण्यात आला. जाहिर सभा घेण्यात आली या सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार सह आमदार शिरिष चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व सत्ताधार्यांकडून कशा प्रकारे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे याची माहिती दिली.

यांची सभेला उपस्थिती
या प्रसंगी माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील, जिल्हा बँक संचालक विनोद पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, एन.एस.यु.आय.सरचिटणीस धनंजय चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, दिलरूबाब तडवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, विक्की गजरे, हाजी गफ्फार शाह,नईम शेख, इमरान पहेलवान सह सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

